आरोग्यकृषीक्राईमक्रीडाघटना/दुर्घटनादेशमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोज़गारवन विभागविदेश

मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीतून असलम शाह अग्रेसर प्रत्येक मिनिटाचे मायक्रो प्लॅनिंग जमेची बाजू

     बुलडाणा : असलम शाह हसन शाह यांनी आपला जाहीरनामा प्रत्यक्ष मतदाराच्या हातात देऊन त्यांच्याशी चर्चा करणे. त्यांच्यासोबत फोटो काढणे, आणि त्यांच्या समस्या जाणून घेणे. तर आलेल्या समस्या तक्रारी  24 तासात निकाली लावण्याचा त्यांनी चंगच बांधला आहे. प्रचारा बरोबर समस्या तक्रारी जाणून घेण्यासाठी, त्या सोडविण्यासाठी निवडणुकीतही कार्यतत्पर असणारे असलम शाह चर्चेचा विषय ठरत आहे. तर आलेल्या समस्या तक्रारी निराकरण करण्यासाठी अँड.सतीशचंद्र रोठे पाटील स्वतः आघाडीवर आहेत. आलेली समस्या तिचे निराकरण आणि तिचा पाठपुरावा लगेच तक्रारदारांच्या मोबाईलवर पाठवण्यासाठी स्पेशल वार रूम सुद्धा असलम शाह यांनी सुरू केली आहे. तर ते जनतेला मत मागण्याबरोबर समस्या असल्यास प्रथम कळवा हे आवाहन करत आहे. तर त्यावर त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांचे लेखी निवेदन ते स्वीकारत आहे. त्यामुळे असलम शाह हसनशाह मतदारांच्या पसंतीस उतरत आहे. कोणताही गाजावाजा नाही, बडे जाव नाही. लोट गाडी आणि त्यावर सिलेंडर ठेवून प्रचार करणाऱ्या एका गरीब मुस्लिम समाजाच्या उमेदवारालाही मतदारांनी पसंती देत डोक्यावर घेतले आहे.घाटाखालील व घाटावरील 900 गावात असलम शाह  यांनी वारकरी महिला संघटना, मराठा समाज बांधव, दलित समाज बांधव यांना सोबत घेत वेगवेगळ्या माध्यमातून हाऊस टू हाऊस आणि माऊथ प्रचारावर भर दिला आहे. सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत मतदानाच्या दिलेल्या वेळेत प्रत्येक मिनिटाचे मायक्रो प्लॅनिंग करून असलम शाहांचा  प्रचार आघाडीवर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *