राजकीय

वंचित युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांचा राजीनामा वरिष्ठांकडून मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप

बुलडाणा : वरिष्ठांकडून विश्वासात न घेता डावलल्या जात असून, पक्ष संघटन वाढविण्याच्या कार्याला प्रोत्साहन देण्याऐवजी खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप करत वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी ५ मे रोजी ‘वंचित’चे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान समाजाची दखलपात्र लोकसंख्या असताना देखील समाजबांधवांची हतबलता दिसून आली. या परिस्थितीने व्यथीत झाल्यानेदेखील आपल्याला हे पाऊल उचलावे लागल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पवार यांनी ‘ना’राजीनाम्याचे पाऊल उचलल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकशाही मार्गाने विविध प्रकारच्या आंदोलनांच्या माध्यमातून वर्षभरात सुशिक्षित बेरोजगार युवकांसोबतच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावले. जनतेला न्याय मिळवून देणे, एवढेच ध्येय समोर ठेऊन काम केले. मात्र, प्रामाणिकपणे केलेल्या कामाची आणि निष्ठेची कुठलीही कदर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून झाली नाही, याची खंत असल्याने आपण राजीनामा देत असल्याचे सतीश पवार यांनी म्हटले आहे. याउलट माझ्यावर वरिष्ठांकडून तथ्यहीन आरोप केले जात आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *