बुलडाणा : केंद्र सरकारने जनहिताच्या अनेक योजना राबविल्या. विरोधकांनी मात्र साठ वर्ष एक हाती सत्ता असतांना जनतेसाठी काही केले नाही ते मोदींनी 10 वर्षात करून दाखवलं आहे. त्यामुळे मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याची गॅरंटी जनतेने घेतली आहे. इंडिया आघाडीकडे ना झेंडा आहे, ना अजेंडा असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा येथे केले.
बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन शहरातील ओंमकार लॉन येथे 14 एप्रिल रोजी करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर मंत्री गुलाबराव पाटील, महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री संजय सिरसाट, राजेंद्र शिंगणे, संजय कुटे, संजय रायमुलकर, आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्र्वेताताई महाले, माजी आमदार सर्वश्री विजयराज शिंदे, तोताराम कायंदे, धृपतराव सावळे, शशिकांत खेडेकर यांच्यासह मित्र पक्षाचे सर्वश्री विठ्ठल लोखंडकार, नाझीर काझी, विनोद वाघ, गणेश मान्टे, सचिन देशमुख, नरहरी गवई, शांताराम दाणे, बळीराम मापारी, ओमसिंग राजपुत, योगेंद्र गोडे, विजय गवई, तुषार काचकुरे, नाना पाटील, प्रभाकर डोईफोडे यांच्यासह मित्रपक्ष व महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
पुढे बोलतांना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे म्हणाले की, जगात देशाची पत वाढविण्याचे काम मोदी साहेबांनी केल आहे, आपल्या देशाची अर्थव्यवस्था वाढवीली आहे. पुर्वी भारताला कोणी एैकत नव्हते. पण आज मोदी साहेबांमुळे भारताला मोदी साहेबांमुळे आज भारत बोलतो तर सर्व जग येकते, अशी परिस्थिती आज जगामध्ये निर्माण झाली आहे. याचा अभिमान आपनासर्वांना असला पाहिजे मात्र काही लोक परदेशात जाऊन देशाची बदनामी करत असल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांवर आरोप केला. मोदी सरकारने देशाचा विकास केला आहे. देशाला विकासाच्या या प्रवाहाला पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहे, त्यासाठी प्रतापराव जाधव यांना प्रचंड बहुमताने आणा असे आवाहन त्यांनी केले.
विकासाचा लेखाजोखा मांडत खासदार जाधवांची चौफेर फटकेबाजी :
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करणार आहोत. तसेच त्यांच्या आपकी बार 400 पार या अभियानात जिल्ह्यात वाटा उचलावा व आपणाला नरेंद्र मोदी यांच्या सेवेची संधी द्यावी, असे आवाहन प्रतापराव जाधव यांनी केले.
आपल्या प्रचार सभेत प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, मागील दहा वर्षात जिल्ह्याचा कायापालट झाला आहे. त्यापूर्वी केंद्रात काँग्रेसची सरकार होते, त्यावेळी जिल्ह्यात काहीही विकास झाला नाही. मात्र मागील दहा वर्षात जिल्ह्यात हजार कोटी रुपयांचा विकास झाला आहे. पूर्वी जिल्ह्यात एकच नॅशनल हायवे होता. त्यावरही अनेक ठिकाणी खड्डे होते त्यामुळे हा रस्ता खड्ड्यातून आहे की, खड्ड्यातून हायवे आहे हे कळायला मार्ग नव्हता. आता मात्र जिल्ह्यातील प्रमुख 15 मार्गाचा समावेश नॅशनल हायवे म्हणून करण्यात आला आहे. विरोधक माझ्यावर आरोप करतात की जिल्ह्याचा विकास झाला नाही. आज त्यांच्या गाड्या देखील याच
रस्त्याने सुसाट वेगाने धावत आहेत. आज जिल्ह्यातला कोणताही व्यक्ती मुंबई नागपूरला कमी वेळेत पोहोचतो.
एवढेच नव्हे तर दहा वर्षात दोन मुख्य असलेले रेल्वे मार्ग मंजूर झाले आहेत. यात बहुप्रतिक्षित जालना-खामगाव तसेच अकोट-जळगाव-बऱ्हाणपूर-खंडवा हा मार्ग आहे. पूर्वी केंद्र सरकार जिल्ह्याला सिंचनासाठी एक रुपयाही देत नव्हता मात्र मागील दहा वर्षात केंद्र सरकारने सिंचनासाठी साडेसहा हजार कोटी रुपये दिले आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारमाही पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी नदीजोड प्रकल्पही राबवला जात आहे. जिल्ह्याला या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारने दोन हजार कोटी रुपये मागील बजेटमध्ये मंजूर केले आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील 70 टक्के पेक्षा जास्त शेतकऱ्यांकडे बारमाही पाणी उपलब्ध असेल, असे आश्वासन देत आपले विरोधक कोणी उभरेल तर कोणी गारूडी आहे, असा टोला लगावत गारुड्यांच्या खेळाचे मतात रूपांतर होऊ शकत नाही, त्यामुळे अफवांना व अमिषाला मतदारांनी बळी पडू नये असे आवाहन हे केले.