बुलडाणा : दुचाकी चोरणाऱ्या तिघांना बोराखेडी पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ३ लाख ९५ हजार रुपये किंमतीच्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खरबडी येथील मोहसीन शाह यांची 17 एप्रिल रोजी खरबडी रोडवरील दुकानासमोर एमएच १४ एएफ ८६८३ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली होती. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे खरबडी रोडवरील आयान खान नूरहसन खान याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आली होती. तसेच एक विना क्रमांकाची दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली असून चौकशीतून शेख मुज्जमिल शेख रफिक , विश्वराज प्रकाश सुरडकर (रा. रिधोरा) या दोघांची नावे समोर आली. त्यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांच्याकडूनही पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहेत.